विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन चांगलेच वाढवले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उतरवण्याचा निर्धार केला होता. यासाठी ते अंतरवाली सराटीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती देखील घेत आहेत. मनोज जरांगेंनी मराठवाड्यातल्या बीडमधील १७ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. हे १७ इच्छुक उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे १७ जणांनी इच्छुक म्हणून मुलाखत दिली होती. आता हे १७ जण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर ३० तारखेला जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार मैदानात कायम राहणार असून उर्वरित उमेदवार हे आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतील, असे निश्चित झाले आहे.
बीड मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग असून जरांगे पाटील यांचा उमेदवार मैदानात उतरल्यास प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे. मनोज जरांगेच्या निर्णयामुळे मराठवाड्यामध्ये महायुतीसह महाविकास आघाडीचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.