Shrinivas Vanga Saam Tv
महाराष्ट्र

Shrinivas Vanga: ३६ तासांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले, कुटुंबीयांना भेटून पुन्हा निघून गेले

Shrinivas Vanga Returned Home: आज पहाटे श्रीनिवास वनगा हे घरी आले. कुटुंबीयांना भेटले आणि ते पुन्हा बाहेर निघून गेले. वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली.

Priya More

रूपेश पाटील, पालघर

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले आणि घर सोडून निघन गेले होते. तब्बल ३६ तासांनंतर श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला. आज पहाटे श्रीनिवास वनगा हे घरी आले. कुटुंबीयांना भेटले आणि ते पुन्हा बाहेर निघून गेले. वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली. वनगा घरी आले घरे पण परत ते बाहेर निघून गेले. वनगा यांनी अज्ञातवासामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अखेर तब्बल ३६ त्यानंतर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा याचा कुटुंबीयांशी संपर्क झाल्याचे समजते. पहाटे श्रीनिवास तीनच्या सुमारास वनगा हे घरी येऊन कुटुंबीयांना भेटून पुन्हा दोन दिवस बाहेर गेले असल्याची माहिती त्याच्या पत्नी सुमन वनगा यांनी दिली. आपल्याला आरामाची गरज असल्याचं कारण सांगत श्रीनिवास पुन्हा बाहेर गावी जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कुटुंबीयांची चिंता मिटलेली आहे. पालघर विधानसभेसाठी तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा हे व्यतीत होऊन कुटुंबीयांना न सांगता घराबाहेर निघून गेले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय चिंतेत होते. मात्र श्रीनिवास यांनी घरी येऊन कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला.

पालघर विधानसभाचे तिकीट नाकारल्यानंतर विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नैराश्येमध्ये गेले होते. 'आश्वासन देऊनही एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला नाही तर उद्धव ठाकरे हे आपल्यासाठी देव असून मी त्या देव माणसाला फसवले.' असे वक्तव्य श्रीनिवास वनगा यांनी केले होते. तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा घरात कोणालाही कल्पना न देता घरातून बाहेर पडले. गेल्या ३६ तासांपासून श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही फोन बंद होते त्यामुळे कुटुंबीय चांगलेच चिंतेत आले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील चिंता वाढली होती. पण अचानक बुधवारी पहाटे श्रीनिवास वनगा हे घरी आले. कुटुंबीयांची भेट घेतली आणि मला आरामाची गरज आहे असं सांगून ते पुन्हा निघून गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT