Beed Shivsena News Saamtv
महाराष्ट्र

Beed News: मोठी बातमी! बीड शिवसेना जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; सुषमा अंधारेंना मारहाण केल्याच्या दाव्यानंतर कारवाई

उद्या बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होत आहे. त्याआधीच बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

विनोद जिरे

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना, "मी दोन चापटा लावल्याचा दावा करणाऱ्या" बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्या बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होत आहे. त्याआधीच बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Beed Shivsena News)

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्या बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होत आहे. याच पार्श्वभूमीवर काल सायंकाळी शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह संपर्कप्रमुख धोंडू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी हे, बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही वेळात जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी स्वतः व्हिडिओ जारी करत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. (Latest Marathi News)

पैसे घेऊन पद वाटप करतात, यासह अनेक गंभीर आरोप या व्हिडिओमधून जाधव यांनी केले होते. यामुळेच मी त्यांना दोन चापटा लावल्या असा दावा देखील व्हिडिओ जारी करत आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. या दाव्यानंतर आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यासोबतच संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनाही पदावरुन हटवण्यात आले आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT