Cm Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'पुढचे २० वर्ष एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री...' शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं भाकित

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे हेच २० वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे भाकित शिंदे गटाच्या आमदाराने केले आहे.

संदीप नागरे

Santosh Bangar News:

शिवसेनेच्या आमदार अपात्रेबाबतची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर पार पडत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणावर राहुल नार्वेकर काय अन् कधी निर्णय देणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार असल्याचा दावा केला जात असतानाच एकनाथ शिंदे हेच २० वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे भाकित शिंदे गटाच्या आमदाराने केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राज्याचे राजकीय समीकरण बदलून गेले आहे. अजित पवार यांच्या एन्ट्रीनंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून लवकरच दादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मोठे भाकित केले आहे.

काय म्हणाले संतोष बांगर?

"जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच मुख्यमंत्री राहावे अशीच आमची इच्छा असल्याचे संतोष बांगर म्हणाले. तसेच यापुढे २० वर्ष तेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावाही बांगर (Santosh Bangar) यांनी यावेळी केला.

पक्षाचा आदेश आल्यास फडणवीसही केंद्रात...

दरम्यान, यावेळी बोलताना आमदार बांगर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबद्दलही मोठे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे काम खूप चांगले आहे. पक्षाचा आदेश आल्यास त्यांनाही केंद्रात जावे लागेल.. असे संतोष बांगर म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT