Many leaders and workers from Nashik joined Shiv Sena in the presence of Deputy Chief Minister Eknath Shinde. yandex
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंनी डाव साधला, भाजपसह राष्ट्रवादी चीतपट; बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते पक्षात सामील झाल्याने नाशिकमध्ये शिवसेनेला मोठी चालना मिळाली आहे. या निर्णयामुळे या प्रदेशात पक्षाचा पाया मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

Bharat Jadhav

  • नाशिकमधील भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा झाला.

  • अमोल शिंदे यांची शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका प्रक्रिया पार पडल्या असतील तरी शिवसेनेतील इनकमिंग अजूनही सुरूच आहे. नाशिकमधील आपली राजकीय ताकद वाढवत शिवसेने भाजप आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय. भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षातील बड्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण हाती घेतले आहे.

नाशिक शहरातील भाजपचे युवा कार्यकर्ते अमोल शिंदे यांनी शिवसेनेत पक्षात प्रवेश केला. त्यांचे बंधू गणेश शिंदे हे देखील नगरपालिका निवडणुकीत पक्षात आले असून ते नगरपालिकेचे गटनेते देखील आहेत.

अमोल शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करताच पक्षाने उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे. यासह येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि विविध पक्ष तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भगवा ध्वज हाती घेत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुंबई येथील नंदनवन बंगल्यावर जाऊन त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं.

पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत आहे. तुम्ही चांगले काम करा, तुमच्या प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल. शिवसेना दिलेला शब्द पाळते म्हणून एका गरीब घरातील लाडक्या बहिणीला शिवसेनेची राज्यसभेची उमेदवारी दिली. शिवसेना कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष आहे. अनेक पदाधिकारी प्रवेश करत आहेत. नाशिकमध्ये योग्य वेळी सगळे योग्य होईल.

येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि विविध पक्ष तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भगवा ध्वज हाती घेत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्याप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, युवा नेते कुणाल दराडे, येवला पालिकेचे गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विशाल परदेशी, लासलगाव युवा सेनेचे तालुकाप्रमुख अभिजित डुकरे, नगरसेवक प्रशांत शिंदे, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख ऋषिकेश दौंडे आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख आली समोर, आताच करा नोट

Crime news India: बाप की सैतान! पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केली हत्या, पोलिसांकडून पित्याला अटक

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' नाही 'ही' स्पर्धक मारणार बाजी

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT