पराग ढोबळे. साम टीव्ही, प्रतिनिधी
महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेलच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशा राजकीय चर्चा रंगल्या आहेत. आमच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
आज नागपुरच्या ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमामध्ये ते म्हणाले, 'माध्यमांना सकाळी सांगितलं.. सरकारमध्ये वादविवाह नाही. बातम्या कमी झाल्या की कोल्डवार करतात. एका मिटीगंला नाही गेलो की नाराज म्हणतात. मी एकदा मिटींगला नाही गेलो, अगोदरच मुख्यमंत्री एकदाच मंत्रालयात गेले'
'कितीही ब्रेकिंग दिलं तरीही आम्ही ब्रेक होणार नाही. विकासाचा अजेंडा आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत टीम म्हणून, डबल इंजिन सरकार म्हणून काम करत आहोत', असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पक्षाप्रवेशावर बोलताना ते म्हणाले, मी डॉक्टर नाही, पण मी मोठमोठे ऑपरेशन करुन मोकळा झालो आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याबाबत धमकी आली होती. त्यावर बोलताना शिंदे यांनी 'एकनाथ शिंदे घाबरणार नाही. अनेक धमक्या आल्यात. नक्षलमुक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस काम करत आहे. सुरजागड प्रकल्प सुरू झाल्याने आज लोक काम करत आहे. विदर्भात विकास करायचा आहे. विदर्भाला न्याय देण्याचा काम सरकार करणार आहे' असे वक्तव्य केले.
शिवसेना काँग्रेसचा दावणीला बांधला, धनुष्यबाण गहाण ठेवलं तेव्हा आम्ही उठाव केला. शोलेच्या असरानीसारखी ठाकरेंची अवस्था झाली आहे. मागे कोणीच उरले नाही. तुम्ही कसं काय मला गायब करणार, एकनाथ शिंदे हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.