Ajit Pawar Dhananjay Munde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलं? DPDC च्या बैठकीत काय घडलं?

Ajit Pawar And Dhananjay Munde: बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज डीपीडीसीची बैठक झाली. या बैठकीमध्ये अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या शेजारी न बसल्यामुळे जोरदार चर्चा होत आहेत.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीच्या बैठकीला सुरूवात झाली. या बैठकिचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्यापासून दूर बसल्याचे दिसत आहे.

अजित पवार यांच्या बाजूला पंकजा मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या बाजूला धनंजय मुंडे बसल्याचे दिसत आहे. या फोटोवरून अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या शेजारी बसणं टाळलं असल्याची चर्चा होत आहे.

कारण याआधी ज्या काही बैठका झाल्या आहेत त्यामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे हे नेहमी शेजारी बसल्याचे पाहिले आहे. आज सकाळी अजित पवार हे बीडमध्ये पोहचले होते तेव्हा धनंजय मुंडे हे त्यांच्या शेजारी डाव्या बाजूला उभे होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितले होते की बीडमधील परिस्थिती बदलण्याची गरज आहे.

या परिस्थितीत कोणी चुकीचे वागेल त्यावर कारवाई केली जाईल असे सांगतले होते. अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी सज्जड दम दिला. 'चुकीचं वागला तर कारवाई केली जाईल. नियमाप्रमाणे कलमे लावली जातील. मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही.', असा दम त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT