Devendra Fadnavis yandex
महाराष्ट्र

Devendra Fadnavis :फडणवीसच मुख्यमंत्री, औपचारिक घोषणा बाकी ?

Devendra Fadnavis News In Marathi: विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालंय. आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे.

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभुतपुर्व यशानंतर मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय..मुख्यमंत्री पदाची माळ पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. असं झाल्यास फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील.

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस..2014 साली भाजपनं धक्कातंत्राचा वापर करुन वयाच्या 44व्या वर्षी जबाबदारी दिलेले आणि राज्याला लाभलेले तरुण मुख्यमंत्री.त्यानंतरच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत फडणवीसांनी आपल्या राजकारणची छाप पाडली.

इतकी की अगदी फडणवीस केंद्रात जातील,पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांची चर्चा होऊ लागली. गेल्या 10 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली.

भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसच होणार हे जवळपास स्पष्टच आहे.

21 जून 2022 साली एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन बंड केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. त्यामुळे सगळं ठरल्यानुसार सुरळीत पार पडलं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री होणार आहेत. असं झाल्यास फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT