Maharashtra Politics: Congress Mla Reacts After Sanjay Raut's ₹20 Crore Offer Claim saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आमदाराला 20 कोटींच्या ऑफर; संजय राऊतांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेत्यानं केली ऑफरची पोलखोल

Congress MLA : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना पक्ष बदलण्यासाठी २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा राऊतांनी केला. यावर आमदाराने आता प्रतिक्रिया दिली आहे.

Bharat Jadhav

  • काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना कथितपणे 20 कोटी रुपयांची ऑफर

  • या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली

  • धीरज लिंगाडे यांनी राऊत यांच्या दाव्यानंतर माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला.सहा खासदारांचा बंडामुळे राज्यातील राजकारणासह देशात खळबळ उडाली होती. आता शिंदे पुन्हा ऑपरेशन टायगर राबवत उद्धव ठाकरेंचे आमदार फोडणार असल्याची चर्चा आहे. आमदारांना फोडण्यासाठी कोटी कोटी रुपयांची ऑफर दिली जातेय, असा धक्कादायक खुलासा खासदार संजय राऊत यांनी केलाय.

काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांना २० कोटींची ऑफर आल्याचा दावा राऊतांनी केला होता.

राऊतांच्या दाव्यानंतर आमदार लिंगाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राऊतांच्या दाव्यानंतर ठाकरे गटानंतर काँग्रेसमध्येही बंडखोरी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. धीरज लिंगाडे म्हणाले की, आपल्याला आलेली ऑफरची माहिती आज सकाळी समजली. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्याच्या विधानाचे आपल्याला आश्चर्य वाटत असून ते जे काही बोलले ते पूर्णपणे खोटे आहे.

अशी कोणतीही ऑफर आली नाही. माझ्या संदर्भात जो काही दावा करण्यात आला तो खोटा आहे. मला कोणत्याही राजकीय पक्षाची ऑफर आली नाहीये. मी रूग्णालयात देखील भरती नाही, असे स्पष्ट शब्दात धीरज लिंगाडे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. राऊतांच्या दाव्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली पहिली प्रतिक्रिया दिली. मात्र, आमदार धीरज लिंगाडे यांनी अशी कोणताही ऑफर नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT