Ashok Chavan Vs Radhakrishna Vikhe Patil Saamtv
महाराष्ट्र

Ashok Chavan News: 'भाजपमध्ये कोण- कोण जाणार? नावे जाहीर करावी...' अशोक चव्हाणांचे विखे पाटलांना आव्हान

Ashok Chavan Vs Radhakrishna Vikhe Patil: कॉंग्रेसमधील अनेक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला होता. विखे पाटलांच्या या दाव्यावर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड|ता. ३ जानेवारी २०२४

Maharashtra Politics:

देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वार- पलटवार अन् आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसमधील अनेक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला होता. विखे पाटलांच्या या दाव्यावर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

"काँग्रेसमधील (Congress) अनेक जण भाजपात येण्यासाठी इच्छुक असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते. विखे पाटील यांच्या या विधानावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले असून भाजपाच्या संपर्कात कोण कोण आहेत त्यांची नावे जाहीर करावी, असं गुपीत ठेऊ नये..." असा टोला अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी लगावला आहे.

जागा वाटपासंदर्भात मतभेद नाहीत..

"महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागा वाटपासंदर्भात काँगेसच्या केंद्रिय समितीने आमची मत जाऊन घेतली. केंद्रिय समीती जे निर्देश देईल त्या अनुषंगाने तिन्ही पक्षाशी चर्चा करुन, मित्र पक्षांना सोबत घेऊन निर्णय अपेक्षित असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांना सोबत सोबत घेण्याविषयी मतभेद नाहीत, जागा वाटपात मार्ग निघेल याची खात्री असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले तर स्वागत..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या महाविकास आघाडीमध्ये प्रवेशाबद्दलही अशोक चव्हाण यांनी मोठे विधान केले. गेल्या वेळी राजू शेट्टी काँगेस सोबत आले होते तेंव्हा त्यांना त्यांची आणि सांगलीची अश्या दोन जागा दिल्या होत्या. आता ते आले तर त्यांचं स्वागत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.

चिखलीकरांना टोला..

"अशोक चव्हाण भाजपात आले तरीही लोकसभेची निवडणूक मीच लढवनार असा दावा नांदेडचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला. माझा पक्ष आणि मोदीसाहेब सोबत आहेत त्यामुळे मला कोणीही हरवू शकत नाही, असा विश्वासही चिखलीकरांनी व्यक्त केला होता. यावर बोलताना अशोक चव्हाण यांना मी कश्याला घाबरायचं, त्यांना उत्तर द्यायच नाही. ती मोठी मानस आहेत.." असा टोला लगावला.

(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT