Dindoshi News:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर! दिंडोशीमध्ये राडा; विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुखामध्ये तुफान हाणामारी

Dindoshi News: शिवीगाळ व मारामारीची घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेटर डिस्पॅच करण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे| मुंबई, ता. २४ ऑगस्ट २०२४

राज्यामध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असताना शिवसेना शिंदे गटामधील अंतर्गत कलह सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे. दिंडोशीमध्ये शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळून आला असून विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला असून दिंडोशी विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या शिवीगाळ व मारामारीची घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेटर डिस्पॅच करण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शाखाप्रमुख संतोष लाड आणि विभाग प्रमुख नितीन स्वामी यांच्यामध्ये लेटर डिस्पच करण्यावरुन वाद झाला. या वादाचे रुपांतर मारामारी होऊन दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ व एकमेकांना मारहाण करण्यात आली.

शाखाप्रमुख संतोष लाड यांच्या कार्यालयात येऊन विभाग प्रमुख नितीन स्वामींकडून लाड यांच्या कार्यकर्त्याला सुरुवातीला शिवीगाळ केली. राग अनावर होताच संतोष लाड करून नितीन स्वामीला मारहाण झाली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांमध्ये कोणताही गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT