Chandrasekhar Bawankule On Uddhav Thackeray And Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule Video : ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांचा गंभीर आरोप

Maratha And OBC Reservation: मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Priya More

'ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत', असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही असे विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका करताना सांगितले की, 'केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे. याचा राज्याशी संबंध आहे. राज्याची भूमिका आहे. राज्याने निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही ऐवढ्या दिवस सत्तेत होता. शरद पवार यांची नेहमी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका राहिली आहे. हे लपून नाही आहे. त्यांच्या सरकारमधील जीआर पाहिले तर त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आले असते. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांसारख्या सवलती देता आल्या असत्या. पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार बोलत आहे हे आश्चर्य आहे.'

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'आपले सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण गेले. जे आमचे महायुतीच्या देवेंद्र फडणवीसांनी दिले. आता तुम्ही बोंबा मारत आहेत. कुठल्या अधिकाराने बोंबा मारत आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारे आमचे महायुतीचे सरकार आहे.'

तसंच, 'हे सकाळचे भोंगे आहेत आणि ३ पार्ट्या महाविकास आघाडी आहेत हे फक्त लोकांना संभ्रमित करून विकासापासून दूर नेत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. ऐवढे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले आहेत त्यावर सरकारचे अभिनंद करणार नाही. सरकारला कुठल्याही गोष्टीचे क्रेडिट देणार नाहीत. मात्र लोकांना डायवर्ट करत आहेत. मीडियाच्या माध्यमातून विकासाचे कामं डायवर्ट करत आहेत. महाराष्ट्राचे हित विकासावर आहे.', असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद

BJP vs TMC Clash : निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हत्यासत्र, भाजप नेत्यासह आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

Accident News: मोठी बातमी! 'प्रभास'च्या क्रू मेंबर्सच्या कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर

Pune : पोलीस दलात खळबळ! १.५ लाखांची लाच घेताना हवालदाराला रंगेहाथ पकडलं; कारवाईदरम्यान तक्रारदाराच्या छातीचा घेतला चावा

Health care: जेवणानंतर फळे खाणं योग्य आहे का? कोणती फळे ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT