Maharashtra Politics Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule  Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule News: 'मी माझ्या पक्षाशी बांधील...', अजित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या

Supriya Sule On Ajit Pawar Group: कर्जतमधील मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी "माझा मतदारसंघ सोडून मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही... असे सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ३ डिसेंबर २०२३

Maharashtra Political News:

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्धार मेळावा कर्जमध्ये पार पडला. या मेळाव्यातून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे असलेली बारामती लोकसभा लढवणार असल्याचीही घोषणा केली होती. अजित पवारांच्या या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज राज्यांतील निवडणूक निकालांवरही त्यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"या निकालाचा लोकसभा निवडणूकीवर परिणाम होणार नाही. मध्यप्रदेशमध्ये भाजपने 'लाडली' नावाची स्कीम चालवली होती. ज्याचा त्यांना फायदा झाल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राजस्थान, मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकले होते मात्र यंदा ते हरले. येत्या लोकसभेत चित्र वेगळे असेल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अजित पवारांवर टीका...

कर्जतमधील मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी "माझा मतदारसंघ सोडून मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला, कुटुंबाला बांधील आहे," अशी प्रतिक्रिया दिली. तसेच "शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणे गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण बोलणे योग्य नाही.. " असे त्या यावेळी म्हणाल्या.

तसेच कर्जतच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री यांनी बारामतीसह चार लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली होती. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी "मला माहिती नाही माझा समोर कोण उमेदवार आहे? आधी लोकसभा होऊ द्या मग विधानसभा.." असे सुचक वक्तव्य त्यांनी केले. (Latest Marathi News)

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बैठक

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

प्राध्यापकासोबत नाव जोडले, मित्र-मैत्रिणींकडून अपमान सहन झाला नाही; आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

Chana Koliwada Recipe: स्टार्टर रेसिपी, कुरकुरीत चना कोळीवाडा घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT