Devendra Fadnavis news  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपचं मिशन २०२४! मतदार संघ निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर; 'या' दिग्गजांकडे पुणे, बारामतीची जबाबदारी

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने आत्तापासूनच मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे...

Prachee kulkarni

Maharashtra BJP News: भाजप नेते गिरिश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या निवडणूकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. अनेकांनी या जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या लोकसभा जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजपने २०२४ च्या निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. ज्यासाठी भाजपने मतदार संघातील निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. (Maharashtra Politics)

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी २०२४ (Loksabha Election) च्या लोकसभा निवडणूकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आत्तापासूनच मोर्चेबांधणीस सुरूवात केली असून राज्यातील पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याआधी भाजपने प्रत्येक मतदार संघातील निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ही घोषणा केली असून या यादीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. (Maharashtra Politics News)

यामध्ये पुण्यातील (Pune) तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

SCROLL FOR NEXT