BJP MP Dhananjay Mahadik Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापूरमध्येही कॉंग्रेसला हादरे बसणार; धनंजय महाडिक यांचं सूचक विधान

Dhananjay Mahadik Statement On Congress: राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. कोल्हापुरमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी मोठं विधान केलं आहे.

Rohini Gudaghe

BJP MP Dhananjay Mahadik Statement

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपमध्ये जाण्याची गशक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस नेत्यांकडून चव्हाण यांच्या व्यतिरिक्त एकही आमदार पक्ष सोडणार नाही, असा दावा केला जात आहे. पण काँग्रेसचा (Kolhapur Politics) बालेकिल्ला कोल्हापुरमध्येच भाजपने धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचं समोर येत आहे. (latest politics news)

महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा प्रचंड भ्रष्टाचार झाला. ते सरकार भ्रष्टाचार करणारं सरकार होतं, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. देशामध्ये भाजपला सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचं धनंजय महाडिक (BJP MP Dhananjay Mahadik) यांनी सांगितलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धनंजय महाडिक यांचं सूचक वक्तव्य

जिल्ह्यातील एकनिष्ठ नेते भाजपमध्ये आले, तर आश्चर्य वाटू नये. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपलं भवितव्य भाजपमध्ये वाटत आहे. राज्यात भाजपचे वातावरण झाले आहे. त्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये येतील. त्याला कोल्हापुरही अपवाद राहणार नाही, असं सूचक विधान खासदार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik Statement) यांनी केलं आहे.

धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यामुळे आता कोल्हापुरमध्ये काँग्रेसला खिंडार पडण्याचे संकेत मिळत आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारी करत आहे. अशातच जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसला मोठा झटका बसला (Dhananjay Mahadik Statement On Congress) आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण महायुतीत आले. आता अजून अनेक लोकं भाजपमध्ये येतील, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला (Maharashtra Politics) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: 24 वा हप्ता आला नाही? शेतकऱ्यांनो, या नंबरवर करा फोन; लगेच कळेल पैसे अडकल्याचे कारण

Pune : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! १ नोव्हेंबरपासून अर्ध्या तिकिटात करता येणार PMP बस प्रवास

Pradeep Jadhav Case: प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरण, जे.पी गर्ग यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; तपासातून धक्कादायक माहिती उघड

Ice Facial Benefits : बर्फाचा तुकडा तुमचं आयुष्य उजळून टाकेल! त्वचेच्या आरोग्याला होतील 'हे' ७ सॉलिड फायदे

Maharashtra News Live Update: अखेर मनसेची शिवाजी पार्क येथील रोषणाई रद्द

SCROLL FOR NEXT