Suresh Dhas Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सुरेश धसांच्या निशाण्यावर आता पंकजा? भाजप आमदाराने पंकजा मुंडेंना सुनावलं, नेमकं प्रकरण काय?

Beed Politics : भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंनंतर आता आपला मोर्चा पंकजा मुंडेंकडे वळवलाय. पंकजा मुंडेंवर धसांनी नेमकी काय टीका केलीय? आणि त्यांच्या मंत्रालयाची कशी खिल्ली उडवलीय? पाहूयात विशेष रिपोर्ट.

Snehil Shivaji

Suresh Dhas Pankaja Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या आणि आकाचा आका म्हणत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या सुरेश धसांच्या निशाण्यावर आता पंकजा मुंडे असल्याच दिसतंय. गेल्या अनेक दिवसांपासून पकंजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात शीत वाकयुद्ध रंगलंय. आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांनी केलेल्या उपरोधिक टिकेमुळे सुरेश धसाचं नेक्स्ट टार्गेट पकंजा मुंडें आहेत की काय अशी शंका येतेय. त्याला कारण ठरलंय ते पकंजा मुंडेंचं एक वक्तव्य.

सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केल्यानंतर राज्याचं राजकारण तापलं. मात्र आपल्याच जिल्ह्यातील घटना असूनही राज्याच्या मंत्री आणि धनंजय मुंडेंच्या भगिनी पंकजा मुंडेंनी या घटनेपासून कायमच अंतर राखण्याचा प्रयत्न केला. मी पर्यावरणमंत्री आणि मला पर्यावरणासंदर्भात विचारा असं देखील पकंजा मुंडेंनी पत्रकारांना सुनावलं होतं .आजही त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलण्याचं टाळलं आणि मग भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढलीये. सुरेश धसांनी पकंजा मुंडेंना सुनावल्यानंतर पकंजा मुंडेंनी लगेचच प्रतिक्रीया देत हा राजीनामा घेणाऱ्यांने ही आधीच घ्यायला हवा होता असं म्हणत मुख्यमंत्र्यांना टोला हाणलाय.

बीडच्या पालकमंत्री पदापासून डावल्यानंतर पकंजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली होती पण बीड मधल्या गुंडाराज बाबत आणि सरपंच हत्या प्रकरणाबाबत बोलण्यास त्यांनी कायम आढेवेढे घेतल्याचं दिसलंय. याउलट बीडची बदनामी होत असल्याचा उपदेशाचा डोसही त्यांनी दिला होता. त्यामुळेच सुरेश धस यांनी वेळ मिळेल तिथे पकंजांना टोले मारण्याची एकही संधी सोडली नसल्याचंही दिसलं. त्यांमुळे गोपीनाथ मुंडेंच्या पठडीत शिकलेल्या सुरेश धसांनी मुंडेंच्या पुढच्या पिढीला राजकारणातील धडे शिकवल्याची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT