Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : भाजपला मोठा झटका बसणार? अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

Maharashtra Political News : यवतमाळमधील पदाधिकाऱ्यांचा नाराज गट पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. हे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Saam Tv

यवतमाळमधील भाजपचे नाराज पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून नव्यांना प्राधान्य दिल्याने नाराजी वाढली आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपला मोठा धक्का ठरू शकतो.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात भाजपमधील एका नाराज गटाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. हा गट शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचेही म्हटले जात आहे.

मागील काही वर्षांमध्ये यवतमाळ मतदार संघातील ग्रामीण भागामध्ये भाजपने वर्चस्व निर्माण केले. निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे तेथे भाजपची ताकद निर्माण झाली. माजी आमदार मदन येरावर यांचे खंदे कार्यकर्ते तयार झाले. पण काही काळापासून पदाधिकारी नाराज असल्याचे म्हटले जात आहे. दुजाभावाच्या वागणूकीमुळे हा गट नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपमध्ये अन्य पक्षातून इनकमिंग सुरु आहे. अशात नव्याने पक्षात येणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे जुन्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. निष्ठावंतांना सोडून बाहेरुन आलेल्या लोकांना पक्षात प्राधान्य मिळत आहे. यामुळे यवतमाळमधील हा गट नाराज असल्याचे म्हटले जात आहे. ग्रामीण भागातील भाजपच्या गटाने पालकमंत्री संजय राठोड यांची गुप्त भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीत पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली आहे.

यवतमाळ मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील नाराज पदाधिकार्यांनी संजय राठोड यांची गोपनीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेशाशी संबंधित चर्चा झाली. या पदाधिकाऱ्याचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT