Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पवारांचा डाव..समरजित घाटगेंनी फुंकली तुतारी, मुश्रीफांविरोधात घाटगे मैदानात

Assembly election 2024 : भाजप नेते समरजित घाटगेंनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे कागलमध्ये विधानसभेत मंत्री मुश्रीफांविरोधात घाटगे तुतारी फुंकणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

Tanmay Tillu

तन्मय टील्लू,साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूरच्या राजकारणात पवारांनी भाजपला आणखी एक धक्का दिलाय. भाजप नेते समरजित घाटगेंनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे कागलमध्ये आगामी विधानसभेत मंत्री हसन मुश्रीफांविरोधात घाटगे तुतारी फुंकणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. मात्र यावेळी घाटगे पवारांच्या मदतीनं घडाळ्याविरोधात विजयाचं टायमिंग साधणार का? त्यावरचा हा रिपोर्ट...

कोल्हापुरात अखेर शरद पवारांनी डाव टाकत भाजपला मोठा धक्का दिलाय. कागलचे भाजप नेते समरजित घाटगेंनी अखेर तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. जयंत पाटलांच्या उपस्थितीत घाटगेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं भाजपसारखंच प्रामाणिकपणे काम करण्याच्या आणा भाका घेतल्या. ऐन विधानसभेच्या तोंडावर घाटगेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मुश्रीफांविरोधात मैदानात उतरवण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला मोठा नेला लागलाय. तर घाटगेंना भाजपात आणणा-या फडणवीसांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

मुश्रीफांचं आव्हान मोडून काढण्यासाठी समरजित घाटगेंनी 2016मध्ये भाजपची कास धरली होती. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला गेल्यामुळे समरजित घाटगेंवर अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली होती.

आता पुन्हा राजकीय समीकरणं बदलल्यामुळे महायुतीतली ही जागा मुश्रीफांकडेच जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे घाटगेंची पुन्हा राजकीय अडचण झाली. आणि त्यामुळेच त्यांनी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पवारांची तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या विधानसभेत तरी मुश्रीफांच्या घड्याळाविरोधात घाटगेंची तुतारी विजयाचं टायमिंग साधणार का याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT