Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपचा काँग्रेसला जोरदार झटका, बड्या नेत्याने सोडली साथ

Sangli political News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सांगलीतील काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून ते सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary -

  • सांगलीतील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • मनोज सरगर हे खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक होते.

  • रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार.

  • भाजपला सांगली महापालिका निवडणुकीत याचा मोठा फायदा होण्याची शक्यता.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांकडून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच भाजप पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकापाठोपाठ एक धक्के देत आहे. भाजपने सांगलीमध्ये काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सांगलीतील काँग्रसचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांनीपक्षाची साथ सोडली असून ते सोमवारी पक्ष प्रवेश करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी पक्षाची साथ सोडली आहे. सोमवारी ते भाजपात प्रवेश करणार आहेत. मनोज सरगर यांचा भाजप प्रवेश करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित राहणार असून रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये मनोज सरगर यांचा प्रवेश होणार आहे. सांगलीतील संजयनगर भागामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मनोज सरगर यांच्या माध्यमातून भाजपने एक प्रकारे काँग्रेस आणि खासदार विशाल पाटील यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला असल्याचे म्हटले जात आहे. संजयनगरसह सांगली भागामध्ये मनोज सरगर यांची ताकद मानली जाते. हिच ताकद आता भाजप आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मनोज सरगर यांच्यामुळे भाजपला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे सांगलीमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT