Maharashtra Politics BJP Criticizes Uddhav Thackeray Over Saamana Editorial on CAA Act Rule  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: CAA वरुन सामना! इथे ही यु-टर्न घेणार की काय? भाजपचा ठाकरे गटाला खोचक सवाल

Gangappa Pujari

सूरज मासुरकर, मुंबई|ता. १२ मार्च २०२४

Maharashtra Politics News:

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाने हा निवडणुकीचा जुमला असल्याचे टीका केली. यावरुन आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणालेत आशिष शेलार?

आघाडी करुन मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीत गेले तेव्हापर्यंत श्रीमान उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (सीएए) केंद्र सरकारचे समर्थन केले होते. आज दै. सामनाने "हा निवडणूक जुमला" असे संबोधून पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू यांची नकारघंटेची भूमिका ठळकपणे अधोरेखित केलेय.

तसेच भूमिकांमध्ये "यु-टर्न फेम" उबाठा गठाला आमचा थेट सवाल आहे..सीएए (CAA) बाबत तुमची भूमिका काय? शरणागती हिंदूना तुमचा विरोध आहे का? इथे ही यु-टर्न घेणार की काय? असा थेट सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामनामधून टीका..

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर मोदी सरकारने निवडणूक जुमल्याची चाल खेळली आहे. देशात नागरिकत्व सुधारणा अर्थात सीएए कायदा लागू करण्याचा वटहुकूम भाजप सरकारने आज अचानक जारी केला असून मध्यरात्रीपासूनच हा कायदा लागू झाला आहे. अशी टीका सामना अग्रलेखामध्ये करण्यात आली होती. (latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT