Babanrao Lonikar Saam Tv
महाराष्ट्र

Babanrao Lonikar: मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद, बबनराव लोणीकरांची सारवासारव; पाहा VIDEO

Babanrao Lonikar Clarification: जालन्यातील परतुर तालुक्यातील आष्टी येथे एका प्रचार सभेदरम्यान बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Priya More

'मराठा समाजाची मतं बोटाच्या कांड्यावर मोजण्या इतकी.', असे वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री आणि परतुरचे भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. जालन्यातील परतुर तालुक्यातील आष्टी येथे एका प्रचार सभेदरम्यान बबनराव लोणीकर यांनी हे वक्तव्य केले होते. बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मराठा समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बबनराव लोणीकर वादात सापडण्याची शक्यता आहे.

दरम्यान मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बबनराव लोणीकरांनी त्यासंदर्भात खुलासा केला आणि सारवासारव केलीय. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून माझा व्हिडिओ व्हायरल केला आहे असा आरोप बबनराव लोणीकर यांनी नाव न घेता अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांच्यावर केला आहे. सध्या बबनराव लोणीकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मराठा समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT