Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा दिलासा! 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव आणि चिन्ह कायम राहणार!

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेले 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल चिन्ह तुर्तास कायम राहणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेले 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल चिन्ह तुर्तास कायम राहणार आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

या सुनावणी दरम्यान कोर्टाने निवडणूक आयोग आणि शिवसेना (शिंदे गट) यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दोघांकडून उत्तरे मागवले आहेत. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. तोपर्यंत ठाकरे गटाला देण्यात आलेले नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्ह कायम राहणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणार का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. या प्रश्नावरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या. परंतु आता सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेने व्हीप लागू केला तरी तो ठाकरे गटातील आमदारांना लागू होणार नाही, तसेच त्या आधारावर ठाकरे गटाचे आमदार अपात्र देखील होणार नाहीत. याशिवाय सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निकालावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत ठाकरे गटाला मिळालेले 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव आणि मशाल चिन्ह कायम राहणार आहे. (Maharashtra Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT