Sharad Pawar News saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; पुण्यातील निवासस्थानी पोलीस फौजफाटा तैनात

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Sharad Pawar News: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका सोशल मीडिया अकाउंटवरुन शरद पवार यांचा उल्लेख करत तुमचाही दाभोळकर होईल अशी पोस्ट करण्यात आली होती. या धमकीनंतर शरद पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. (Maharashtra Political News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. "तुमचा देखील दाभोळकर होणार, "अशी पोस्ट करत शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे.

या धमकीनंतर त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शरद पवार (Sharad Pawar) सध्या पुण्यात असून उद्या ते दिल्लीला रवाना होणार आहेत.त्याआधी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांचीही चौकशी करुन आतमध्ये सोडण्यात येत आहे. (Maharashtra Politics)

राऊत बंधूंना धमकी...

दरम्यान, जेष्ठ नेते शरद पवार यांना धमकी आल्याने खळबळ उडाली असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुनील राऊत यांनाही धमकीचे फोन आले आहेत. सुनील राऊत यांच्या फोनवर अज्ञाताने कॉल करुन दोघाही भावांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहेत. एकाच दिवशी राज्यातील तीन दिग्गज नेत्यांना धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

SCROLL FOR NEXT