Shinde group leader Jackie Rawalani joins BJP in Bhandara — major setback for CM Eknath Shinde. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भंडाऱ्यात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

Bhandara Politics: शिंदे गटाचे नेते जॅकी रावलानी भाजपमध्ये सामील झाले आहेत. भंडारा येथील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला. स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजप महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवत आहे.

Bharat Jadhav

  • भंडाऱ्यात शिंदे गटाचे जॅकी रावलानी भाजपात दाखल.

  • शिंदे गटात नाराजीचे वातावरण निर्माण झालं आहे.

  • जॅकी रावलानी हे शिंदे गटाचे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नेते.

शुभम देशमुख, साम प्रतिनिधी

भाजपनं भंडाऱ्यात राजकीय डाव खेळत शिंदे गटाला जबर धक्का दिलाय. शिंदे गट शिवसेनेचे लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांनी भाजपात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असलेले रावलानी यांना गळ लावत भाजपनं शिंदेंना मोठा धक्का दिलाय. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती काही ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत केली जाईल असं ठरलंय.

त्याच दरम्यान भाजप बहुतेक जिल्ह्यात आपली ताकद वाढवत आहे. पक्षाची मोर्चेबांधणी करत इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेत आहेत. एकीकडे भाजप आपण मोठा भाऊ असल्याचं म्हणतंय. महायुतीमधील इतर पक्ष दुखावतील अशी विधाने करू नका अशा सुचना भाजप पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांना देण्यात येत आहेत. त्याचवेळी भाजप आपल्याच मित्र पक्षातील नाराज नेत्यांना घेरत त्यांना आपल्या पक्षात सामील करू घेत आहेत.

राज्यात नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीला प्रशासन लागले असून नगरसेवक पदाचे आरक्षण देखील जाहीर झाले आहेत, त्यासोबतच राजकिय वातावरण देखील तापत आहे. ,यात भंडारा शहरातील राजकीय समीकरण बदल दिसून येत आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या गटात ऑल इज वेल नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे गटाला येत्या दिवसात मोठा धक्का बसण्याचीचिन्ह दिसून येत होते. त्याचाच भाग रावलानी यांचा भाजप प्रवेश.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी हे नाराज होते. शिंदे गटात लोकशाही राहिली नसल्याचे आरोप जॅकी रावलानी यांनी केले. पक्षाच्या कारभारावर नाराज असलेले जॅकी रावलानी हे नारात होते, त्यातून त्यांनी भाजपाची वाट धरली. आज जॅकी रावलानी यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला.भंडारा शहरात शिंदे गटाला जॅकी रावलानी यांच्या भाजप मध्ये प्रवेशाने मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा| VIDEO

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

SCROLL FOR NEXT