Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, अजित पवारांच्या कट्टर समर्थकाचा तडकाफडकी राजीनामा

Nandurbar NCP News : विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

Satish Daud

सागर निकवाडे, साम टीव्ही नंदुरबार

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा दिल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे. मात्र, पक्षातील मनमानीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सध्या नंदुरबारमध्ये रंगली आहे.

राव मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबारचे (Nandurbar News) जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांचे बंधू आहेत. त्यांची नंदुरबार जिल्ह्यात मोठी ताकद असून तगडा जनसंपर्क आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मोरे हे आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार? याबाबत तर्क वितर्क सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. ५ पैकी केवळ एका जागेवरच पक्षाचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले आहेत.

लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून त्यांनी नव्याने पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे. मात्र, तरीही अजित पवार गटातून अनेक नेते तसेच पदाधिकारी बाहेर पडत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून देखील पक्षांतर होण्याची सुरुवात होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आमदार नितीन पवार यांच्या कळवण- सुरगाणा मतदारसंघाचा करणार दौरा करणार आहेत. सुरगाणामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन तर कळवणमध्ये विविध विकास कामांच अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा दौरा महत्वाचा मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT