Leaders of Shiv Sena and Bharatiya Janata Party face off as the Bhiwandi mayor election turns into a high-stakes political battle. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेसेना करणार भाजपचा गेम? सत्तेचं समीकरण बदलणार, कोण किंगमेकर ठरणार?

Bhiwandi Municipal Corporation: भिवंडीत शिंदेसेनेनं भाजपला खिंडीत गाठलंय. त्यामुळे महायुतीत फूट पडल्याचं चित्र आहे. मात्र शिंदेसेनेनं नेमकी कोणती खेळी केलीय? भिवंडीचं सत्तेचं समीकरण नेमकं कसं असणार आहे.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

  • भिवंडी महापालिकेतील सत्तासंघर्ष अद्याप कायम

  • शिंदेसेनेनं भाजपला थेट आव्हान दिलं

  • महायुतीतील अंतर्गत तणाव उघड

महापालिका निवडणूक झाली. राज्यातील 29 पैकी 28 महापालिकांच्या महापौरांची निवडही झाली. मात्र अजूनही भिवंडीचा तिढा काही सुटला नाही. त्यातच आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या भाजपचा गेम करण्यासाठी शिंदेसेनेनं थेट महापौर आणि उपमहापौरपदासाठी शड्डू ठोकलाय.

महत्वाची गोष्ट म्हणजे भिवंडी निजामपूर महापालिकेचा निकाल लागताच कोणार्क विकास आघाडी आणि शिंदेसेना एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. त्याच दरम्यान विलास पाटील यांना जुन्या गुन्ह्यात अटक कऱण्यात आली. त्यामुळे भिवंडीत राजकीय वातावरण तापलं होतं.. त्यातच आता विलास पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात महापौरपदासाठी अर्ज दाखल केलाय. मात्र भिवंडीतील संख्याबळ कसं आहे? पाहूयात.

भिवंडी महापालिकेत 90 जागा आहेत. त्यापैकी भाजपनं 22 जागा जिंकल्या. काँग्रेसनं 30, शिंदेसेनेनं 12 तर पवारांच्या राष्ट्रवादीनंही 12 जागा जिंकल्या.. दुसरीकडे भिवंडी विकास आघाडीचे 3, समाजवादी पक्षाचे 6 , कोणार्क विकास आघाडीचे 04 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आलाय. आता शिंदेसेनेकडे केवळ 12 नगरसेवकांचं संख्याबळ असतानाही शिंदेसेनेनं आपली ताकद 4 जागा असलेल्या कोणार्क विकास आघाडीच्या मागे उभी करण्यामागे काय शक्यता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT