महाराष्ट्र

Baramati By-Election: बारामतीचा उमेदवार ठरला! राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव जाहीर, बिनविरोध होणार का?

Baramati By-Poll : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी या निर्णयाला दुजोरा दिला.

Bharat Jadhav

  • निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न.

  • बारामतीच्या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष.

  • बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली. बारामती आणि राहुरी येथील निवडणुकांची घोषणा होताच राष्ट्रवादीनं उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

बारामतीमधून सुनेत्रा पवार याच निवडणूक लढवतील, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुमित्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची आज जिजाई बंगल्यामध्ये चर्चा झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांशी बोलणार असल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पोटनिवडणुकीबाबत बोलताना सुनेत्रा पवारच राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार असल्याची माहिती दिली होती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचे सांगितलं जात आहे.

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष बारामती पोटनिवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं जातंय. पक्षांतर्गत बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती दिलीय. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यात विरोधात युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची भूमिका शरद पवार गटाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार आमच्यावर अन्याय करतंय, जरांगे उपोषण करण्यावर ठाम

konkan : दाट जंगलात हरवलेला सागरी किल्ला, कोकणातील 'हे' रहस्यमय ऐतिहासिक ठिकाण पाहिलात का?

Ladki Bahin Yojana : ४ दिवसांत मे महिना संपणार, 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Deepali Sayyad : प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचे फोन; नेमकं काय प्रकरण?

'Deool Band 2' Movie Box Office Collection 7 Days: 'देऊळ बंद 2' चित्रपटाची गाडी सुसाट, पहिल्याच आठवड्यात कमावले तब्बल 'इतके' कोटी रूपये

SCROLL FOR NEXT