Bahujan Samaj Party Candidate Attacked Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक; बुलडाण्यात खळबळ

Bahujan Samaj Party Candidate Attacked: वकील शंकर चव्हाण यांच्यावर ४० ते ५० अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शंकर चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलडाण्याच्या चिखली विधानसभा मतदार संघातील बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. वकील शंकर चव्हाण यांच्यावर ४० ते ५० अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शंकर चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर चव्हाण हे बहुजन समाज पार्टीचे चिखली विधानसभेचे उमेदवार आहेत. शुक्रवारी रात्री शंकर चव्हाण हे मेहकर फाटा परिसरातील त्यांच्या हॉटेलवर लक्ष्मी पूजन आटोपून सहकाऱ्यांसह बसले होते. त्यावेळी ४० ते ५० जणांच्या टोळक्याने त्यांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

शंकर चव्हाण यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. शंकर चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शंकर चव्हाण यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी चिखली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. चिखली पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT