Amravati after the BJP suspended the appointment of its newly announced city president within a day. saam tv
महाराष्ट्र

भाजपमधील अंतर्गत कलह शिगेला; अवघ्या 24 तासातच नव्‍या शहराध्‍यक्षांना नियुक्‍तीला स्‍थगिती

Amravati BJP Internal Rift : भाजपच्या अमरावती शहर अध्यक्षपदी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या व्यक्तीची नियुक्ती २४ तासांच्या आतच स्थगित करण्यात आली आहे. यामुळे पक्षांतर्गत मतभेद समोर आलेत.

Bharat Jadhav

  • अमरावती भाजप शहराध्यक्षपदी नितीन गुडधे यांची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत ती स्थगित करण्यात आली.

  • नियुक्ती स्थगित करण्यामागील कारण अजून सांगण्यात आले नाहीये.

  • भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.

भारतीय जनता पक्षात आलबेल नसून अंतर्गत वाद उफाळून येतोय अशी शक्यता उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली होती. ठाकरेंनी उपस्थित केलेल्या शक्यतेला एक दिवस होत नाही तोच भाजपमधील शह-काटशहाचे राजकारण समोर आले आहे. कटकारस्थानामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकारण तापलंय. त्याचे कारण ठरलंय, नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती.

भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करताना काल शहराध्यक्षपदी नितीन गुडधे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु अवघ्या २४ तासात या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची अशी कोलांटउडी पाहून स्थानिक नेते बुचकळ्यात पडले आहेत. शहरातील राजकारण तापलं असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

काय घडलं नेमकं?

अमरावतीमध्ये सोमवारी दोन नेत्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं होतं. अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हा अध्‍यक्षपदी धामणगाव रेल्‍वेचे आमदार प्रताप अडसड यांची तर अमरावती शहराध्‍यक्षपदी नितीन गुडधे यांची काल नियुक्‍ती करण्‍यात आली होती. स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.

ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रविराज देशमुख यांना हटवून त्यांच्या जागी आमदार प्रताप अडसड यांना जिल्हाध्यक्ष केलं. तसेच शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या जागी नितीन गुडधे यांना शहराध्यक्ष बनवण्यात आलं. पंरतु अवघे काही तास होत नाही तोच त्यांची नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.

भाजपमध्ये अंतर्गत कलह

या फेरबदलांमुळे जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत राजकीय संघर्षाची चर्चा सुरू झाली. भाजपने आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू केलीय. या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनात्मक बळकटीसाठी थेट आमदारांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. तर, अमरावती महापालिकेतील भाजपची खराब कामगिरी आणि मित्र पक्ष असलेल्या युवा स्वाभिमानच्या कुरघोडीवर नियंत्रण ठेवता न आल्याचा ठपका ठेवून डॉ. नितीन धांडेंना हटवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार? उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईत आंदोलन तर समर्थनात नागपुरात मोर्चा

मेडिक्लेममधील काढली अट, रुग्णांची मिटली कटकट, केवळ 2 तास उपचार, तरी मेडिक्लेम मिळणार

अहिर शिंदेसेनेत, ठाकरेंचा किल्ला ढासळणार? आदित्य ठाकरेंना वरळीत अहिरांचं आव्हान?

Weather Update: महाराष्ट्रासह २३ राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

Ambenali Ghat : आंबेनळी घाटात दरड कोसळली, पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक २ तास ठप्प

SCROLL FOR NEXT