Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Akola Politics: अकोल्यात ३ मतदारसंघात बंडखोरी, महायुतीपुढं मोठं आव्हान

Maharashtra Assembly Election 2024: अकोल्यातील बाळापूर, अकोला पश्चिम आणि मूर्तिजापूर मतदार संघात बंडखोरी होणार आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अकोल्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील बंडखोरी होणार आहे. बाळापूर, अकोला पश्चिम आणि मूर्तिजापूर मतदार संघात बंडखोरी होणार आहे. या तिन्ही मतदारसंघात नाराज असलेल्या कार्यकर्त्यांवर तिसऱ्या आघाडीने लक्ष धरून उमेदवारी जाहीर केलीय. बाळापूर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला. अंधारे हे बाळापुर मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र बाळापूर जागा महायुतीमधील शिंदे गटाच्या वाटेवर गेल्याने ते नाराज होते.

तर मविआतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मूर्तिजापूरातून सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिल्याने रवी राठी नाराज होते. त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तिथेही भाजपनं मूर्तिजापुरातून पुन्हा चौथ्यांदा विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना संधी दिली. त्यामुळं आता रवी राठी यांनी बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीची वाट धरली आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघातही भाजपात बंडखोरी होणार आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे हे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात गेले. अकोला पश्चिममधून डॉ. ओळंबे हे बच्चू कडू यांच्या पक्षाचे परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार असणार आहे.

अकोल्यात भाजपाने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याने डॉ. ओळंबे नाराज होते. डॉ. ओळंबे हे अकोल्यातील भाजपचे अंतर्गत राजकारणात डॉ. रणजीत पाटील गटाचे म्हणून ओळखले जातात. डॉ. अशोक ओळंबे कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा त्यांचा समर्थकांच्या बैठकीत निर्धार केला आहे. आज अकोला पश्चिममधून ओळंबे, बाळापूर मतदारसंघातून कृष्णा अंधारे आणि मूर्तिजापूरातून रवी राठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे..

दरम्यान, बच्चू कडू यांच्या पक्षाचे परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे अकोला जिल्ह्यातील ४ मतदारसंघात उमेदवार असणार आहे. अकोट, बाळापूर, मुर्तीजापूर आणि अकोला पश्चिम या मतदारसंघात तिसरी आघाडी आपले उमेदवार देणार आहे. या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारामुळे मतांचे विभाजन होत नेमकं कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime: धावत्या मेमू लोकलमधून महिलेला ढकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडला हत्येचा थरार

काळजाचा थरकाप! प्रशासनाची बंदी झुगारून धबधब्यावर 17 जणांची हुल्लडबाजी; पुण्याचे दोन पर्यटक बुडाले

Thane Tourism : ठाण्याच्या जंगलात लपलाय सुंदर धबधबा, सौंदर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Crime News : मुलीजवळ आला पॅन्टची चैन उघडली अन्...; बसमध्ये तरुणाचं किळसवाणं कृत्य

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

SCROLL FOR NEXT