Loksabha Election Ajit pawar vs Eknath Shinde 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ब्रेकिंग! 'शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटातील ४० आमदारांची घरवापसी होणार', काँग्रेस नेत्याचा सर्वात मोठा दावा!

Maharashtra Politics Breaking News: पुढील महिनाभरात शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील ४० आमदारांची घरवापसी होईल, असा सर्वात मोठा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे| नागपूर, ता. १० जून २०२४

लोकसभा निवडणुकानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वारे फिरले असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील ४० आमदार परत येणार असल्याचा सर्वात मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"भारतीय जनता पक्ष बेईमानांचा पक्ष आहे. उपयुक्त आहे तो पर्यंत उपयोग घ्यायचा नंतर सोडून द्यायचा. गेलेल्यांचे परतीचे दोर कापलेत. परत येऊ शकत नाहीत. पण मी विश्वासाने सांगतो अजित पवार गटातील आणि शिंदे गटातील ४० आमदारांची महिनाभरात घरवापसी होईल, अशी परिस्थिती आहे. वस्तुस्थिती माहीत नाही पण चर्चा जोरात आहे," असे विजय वडेट्वीवार म्हणाले.

दादा गटावर टीका

"कुणालाही संख्या बळावर मान सन्मान मिळतो. आजच्या स्थितीत अजित पवारांकडे सन्मान करण्यासारखे राहिले काय? त्यामुळे जो मिला ओ खाओ.. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण बार्गेनिंग पावर संपली आहे. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले तरी भरपूर आहे, अशी अवस्था अजित पवार गटाची आहे," असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

तसेच "केंद्रात महायुतीचे सरकार आले नसते तर ते बाहेर पडले असते. त्यांची प्रकरणे क्लोज झाली असतील, जसा पटेलांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला. सत्तेत जाऊन आपली प्रकरणे क्लोज करवून परत येत असतील तर ही चांगली आयडिया आहे. भारतातील लोकांना पटणारी आहे, असं समजायला हरकत नाही," अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT