Maharashtra Politics 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसमध्ये जाणार: लोकसभेच्या निकालाआधी सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Sunil Tatkare On NCP Sharad Pawar Group : शरद पवार गटाच्या आमदारांनी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. हे सर्व आमदार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.

Sandeep Gawade

लोकसभेचा निवडणुकीच्या निकाल लागण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेचे वेध लागले आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्याआधी राजकारण तापू लागलंय. दरम्यान आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अनौपचारिक चर्चेत बोलताना सुनील तटकरे यांनी हा दावा केला आहे. शरद पवार गटाच्या आमदारांकडून काही दिवसांपासून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये काही पदाधिकाहीही आहेत. अंतर्गत नाराजीने पाच ते सहा आमदार  दिल्लीमध्ये सातत्याने जातात, ही भेट कोणत्याही क्षणी होऊ शकते, असा दावा त्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सोनिया दुहान, धीरज शर्मा आदी नाराजांचा गट सोनिया गांधींसोबत जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, सुनील तटकरेंनी नेमके कोणते आमदार जाणार आहेत हे सांगितलं नाही.

लोकसभा प्रचारादम्यान शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असं म्हटलं होतं. त्याचवेळी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वैचारिक समानता आहे. दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत कोणताही फरक नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

सुनील तटकरे यांच्या दाव्यानंतर शरद पवारांच्या युवा राष्ट्रवादीचे नेते मेहबुब शेख यांनी भूमिका मांडली आहे.  4 जूनच्यानंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहेत. कारण 4 जूननंतर अजित दादांची नौका बुडणार आहे. अशा या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही. म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील त्याठिकाणी नावेत बसण्याची तयारी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर एसआयटीसमोर हजर राहणार

Accident News : आजीसोबत बाहेर निघाला, वाटेत काळाचा घाला, कारच्या धडकेत नातवाचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात

Fort In Maharashtra : भरती-ओहोटीच्या लाटांवर उभा असलेला 'हा' किल्ला पाहिलाय का? एकदा नक्की भेट द्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

'जय श्री राम'च्या घोषणा बंद करा, भाजप मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केलं शांत; सुवेंदू अधिकारी असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT