Shiv Sena MLAs disqualification: SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यात नवा पेच! विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला ठाकरे गटाकडून उत्तर नाही

Shiv Sena MLAs disqualification: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस पाठवली होती.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics Latest Updates : शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. हा मुद्दा सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. या नोटीसीला उत्तर न देण्याची भूमिका ठाकरे गटाच्या आमदारांनी घेतली आहे.

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदारांना नोटीस पाठवून 14 दिवसात उत्तर देण्याचे सांगितले होते. मात्र मुदत संपूनही ठाकरे गटाकडून या नोटिशीला उत्तर देण्यात आलेले नाही.

शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रच्या संदर्भात आम्ही कारवाईची मागणी केली असताना यामध्ये 16 आमदारांनीच नोटिशीला उत्तर देणे गरजेचे असल्याचे मत ठाकरे गटाकडून मांडण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या इतर आमदारांनी नोटिशीला उत्तर देण्याची गरज नसल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. (Tajya Marathi Batmya)

ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

विधानसभा अध्यक्ष अपात्रतेबात निर्णय घेण्यास विलंब करत असल्याचे म्हणत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतील आहे. याप्रकरणी कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. (Latest Political News)

या नोटीशीत आमदार अपात्र प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली? याचे दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राहुल नार्वेकर यांना १४ जुलै रोजी नोटीस पाठवली होती. त्यामुळे येत्या ३१ जुलैला या प्रकरणातील पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

Jio Recharge Offer: जिओचा नवीन पोस्टपेड प्लॅन धमाका! फक्त 'या' किमतीत ७५ जीबी डेटासह मिळवा प्रीमियम सुविधा

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार; ई-केवायसीला लावला ब्रेक

Malavya Rajyog: नोव्हेंबरमध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य महापुरुष राजयोग, 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

SCROLL FOR NEXT