Ahilyanagar News Saam Tv
महाराष्ट्र

Ahilyanagar News : पुण्यानंतर आता आहिल्यानगर तापलं, जैन समाजाच्या जागेवरून संग्राम जगतापांना घेरलं, ट्रस्टीकडून खुलासा, वाचा संपूर्ण प्रकरण

Ahilyanagar News : अहिल्यानगरातील जैन समाजाच्या जागेवरून आमदार संग्राम जगताप यांच्यावर करण्यात आले. मात्र ते आरोप पूर्णतः खोटे असल्याचं ट्रस्टी सुभाष मुथ्था आणि भाडेकरू गणेश गोंडाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

Alisha Khedekar

किरण काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर जागा लाटल्याचा आरोप केला होता

ट्रस्टी आणि भाडेकरूंनी आरोप फेटाळले

मृत्युपत्रानुसार भाडेकरूंना जागेवर राहण्याचा कायदेशीर हक्क आहे

स्पष्टीकरणानंतर किरण काळेंच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण

सुशील थोरात, अहिल्यानगर

गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी मोहोळकरांवर आरोप केले होते. मात्र आता अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जागा आमदार संग्राम जगताप यांनी चुकीच्या पद्धतीने खरेदी करून लाटल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुणे येथे केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचा दावा आता त्या जागेचे ट्रस्टी सुभाष मुथ्था आणि जागेचे भाडेकरू गणेश गोंडाळ यांनी केला आहे. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर किरण काळे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सदर जागा मंगूबाई होरा यांनी १९७५ साली जैन समाजाला दान केली होती. दानपत्र आणि मृत्युपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, त्या जागेवर जे भाडेकरू राहतात त्यांना जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत तेथेच राहता येईल आणि त्यांना जागेवरून कोणत्याही कारणास्तव हटविण्यात येऊ नये. त्या अनुषंगाने आजही त्या जागेवर गणेश गोंडाळ हे भाडेकरू म्हणून राहात असून, जागेचा ताबा किंवा मालकी बदल झालेली नाही. अशी माहिती ट्रस्टी सुभाष मुथ्था यांनी दिली.

१९७५ साली जेव्हा मंगूबाई होरा यांनी ही जागा जैन समाजाला दान केली, तेव्हाही त्या जागेवर भाडेकरू राहत होते. मृत्युपत्रामध्ये त्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्या जागेची विक्री, खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही. किरण काळे यांनी केलेले आरोप हे पूर्णतः खोटे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भाडेकरू गणेश गोंडाळ यांनी सांगितलं की मी आजही त्या जागेचा भाडेकरू आहे. तेथे असलेला ऑफिस देखील माझे आहे. माझ्या ऑफिसमध्ये आमदार संग्राम जगताप कधी कधी येतात, मात्र त्या ठिकाणी त्यांचे अधिकृत कार्यालय नाही. किरण काळे यांनी मृत्युपत्रातील भाडेकरूंचा उल्लेख जाणीवपूर्वक लपवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याच सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT