Ayodhya Pol| Uddhav Thackeray |Maharashtra Politics Saamtv
महाराष्ट्र

Ayodhya Pol News: 'अस्वस्थ, राजीनामा देण्याच्या तयारीत...' अयोध्या पोळ सोडणार ठाकरे गटाची साथ? पोस्टमुळे रंगल्या चर्चा

Ayodhya Pol News: अयोध्या पोळ यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्या शिवसेना ठाकरे गटामधून बाहेर पडणार की काय? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

Gangappa Pujari

Ayodhya Pol News:

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. या निवडणूकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच राजीनामानाट्य पक्षप्रवेशांचे सोहळेही पाहायला मिळत आहेत. अशातच ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी लवकरच राजीनामा देणार असल्याचे संकेत दिलेत. त्यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाल्यात अयोध्या पोळ?

शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक असलेल्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांनी एक्स सोशल मीडिया माध्यमावर केलेल्या पोस्टची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. या पोस्टमध्ये अयोध्या पोळ यांनी "लवकरच ब्रेकिंग न्यूज. अस्वस्थ आहेत, राजीनामा देण्याच्या तयारीत" असा मजकूर लिहला आहे. तसेच त्यांनी या पोस्टसोबत राजकीय चिखल असा हॅशटॅगही वापरला आहे.

अयोध्या पोळ यांच्या या पोस्टनंतर त्या शिवसेना ठाकरे गटामधून बाहेर पडणार की काय? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी 'ब्रेकिंग न्यूज'चा उल्लेख केल्याने दुसरा कोणता बडा नेता ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे. या पोस्टवर अद्याप अयोध्या पोळ यांच्याकडून कोणतेही स्पष्टिकरण आले नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. (Latest Marathi News)

कोण आहेत अयोध्या पोळ?

शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळ या मुळच्या परभणी (Parabhani) जिल्ह्यातील आहेत. २०१९ पासून त्या शिवसेना ठाकरे गटाच्या सक्रिय नेत्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठाकरे गटाची आक्रमकपणे बाजू मांडताना दिसतात. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यासोबत झालेल्या वादामुळे अयोध्या पोळ चर्चेत आल्या होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT