Shalinitai Patil On Ajit Pawar Saamtv
महाराष्ट्र

Shalinitai Patil: 'अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी, शरद पवारांनी पक्ष अन् चिन्हावर दावा केला नाही...' शालिनीताई पाटलांचा घणाघात

Shalinitai Patil On Ajit Pawar: अजित पवारांनी जी भूमिका घेतली ती स्वत:च्या स्वार्थासाठीच, शरद पवारांनी काॅंग्रेस सोडताना कधीही पक्षाचं नाव, चिन्हावर दावा केला नाही.. असे त्या म्हणाल्या.

सुरज सावंत

Shalinitai Patil News:

राजकीय बंडखोरीवरुन सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले तर मी ६० व्या वर्षी भूमिका घेतली, असा टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला.

अजित पवार यांच्या विधानावरुन माजी मंत्री शालिनीताई पाटील मैदानात उतरल्या असून अजित पवारांनी जी भूमिका घेतली ती स्वत:च्या स्वार्थासाठीच, शरद पवारांनी काॅंग्रेस सोडताना कधीही पक्षाचं नाव, चिन्हावर दावा केला नाही.. असा घणाघात त्यांनी केलायं.

अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी!

"शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या बंडावर बोलताना माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचे अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नये म्हणून होते. तर दुसरीकडे अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी, उपमुख्यमंत्रिपदासाठी होते..." अशी खोचक टीका शालिनीताईंनी केलीयं.

तसेच 'अजित पवार यांच्यावर (Ajit Pawar) भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेला व्यक्ती सत्तेत राहिल्यास राजदंड त्याच्या हाती दिल्यास तो कधी स्वत:ला शिक्षा करून घेईल का ? असा सवालही शालिनताई यांनी यावेळी उपस्थित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हलक्या प्रकारचे राजकारण!

दरम्यान, यावेळी बोलताना शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी राजकारणाच्या सद्यपरिस्थितीवर चिंता व्यक्त केली. पक्ष फोडणं आणि सत्तेत सहभागी करून घेणं हे हलक्या प्रकारचे राजकारण आहे. मोदींना कधीही जनता माफ करणार नाही. राजकारण गढूळ झाले आहे. ते साफ करायची जबाबदारी आताच्या मतदारांवर आहे. तरुणांपुढे काय हा आदर्श, २०२४ च्या निवडणुकीची तरुणं संधी घेतील.. असे त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांचा आंदोलन

Chinese Bhel Recipe: फक्त ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल चायनीज भेळ, रेसिपी लगेच करा नोट

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; मुदतवाढ उद्यावर; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका

Marriage Rules: भावी वर-वधूसाठी महत्वाची बातमी; लग्नपत्रिकेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

School Timing Change: मोठी बातमी! शाळेच्या वेळेत बदल; जिल्हाधाऱ्यांकडून शाळांना कडक आदेश

SCROLL FOR NEXT