Samruddhi Mahamarg On Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघात का होताहेत? भाजपवर निशाणा साधत राऊतांनी थेट कारणच सांगितलं

Samruddhi Mahamarg Accidet: भाजपने महामार्ग निर्माण करताना लोकांच्या जमीनी ओरबडून घेतल्या, असे आरोप राऊतांनी केलेत.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्याच महिन्यात समृद्धी महामार्गावर बस अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अशात याच महामार्गावर पुलाचे काम करताना ग्रेडर-मशिन कोसळून १६ कामगारांचा मृत्यू झालाय. यावरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) होत असलेल्या अपघातांसाठी संजय राऊतांनी भाजपला दोषी ठरवलं आहे. भाजपने महामार्ग निर्माण करताना लोकांच्या जमीनी ओरबडून घेतल्या, असे आरोप राऊतांनी केलेत.

समृद्धी महार्गाने जितके बळी घेतलेत तितके बळी आतापर्यंत कोणत्याही रस्त्याने घेतले नाहीत. श्रद्धा की अंधश्रद्धा काही म्हणा पण हा महामार्ग निर्माण करताना लोकांच्या सुपीक जमिनी, बागायत शेती फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी ओरबडून घेतल्या. त्याचे हे श्राप आहेत. इतके बळी या रस्त्यावर गेले आहेत की लोकं यापुढे या रस्त्याचा वापर करणे सोडून देतील, अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

या व्यासपीठावर जायचं की नाही हा शरद पवार यांचा प्रश्न आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजा पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील कार्यक्रमात उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसच्या नेत्यांकडून विरोध केला जात आहे.

या व्यासपीठावर जायचं की नाही हा शरद पवार यांचा प्रश्न आहे, असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) पवार आणि मोदी भेटीवर म्हटलं आहे. 3 महिने आगोदर आपण निमंत्रण दिलं म्हणून आपण जात आहोत असं पवारांनी म्हटलं. पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यांनी तुमचा पक्ष फोडला आहे. जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलन करत असतील तर मी कार्यकर्त्यांचे स्वागत करतो. मी लोकशाही मानणारा माणूस आहे, असं राऊतांनी यावेळी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT