Supreme Court Assembly Speaker Notice Rahul Narvekar on Mla Disqualification Saam Tv
महाराष्ट्र

MLA disqualification case : ठाकरे गटाची चाल यशस्वी; सुप्रीम कोर्टात धाव घेताच विधानसभा अध्यक्षांचा घाना दौरा रद्द

Rahul Narvekar News: राहुल नार्वेकर पश्चिम आफ्रिकेतील घाना दौऱ्यावर जाणार होते. आपला हा दौरा त्यांनी रद्द केलाय.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाने हे पाऊल उचलल्यानंतर आता राहुल नार्वेकरांनी आपला दौरा रद्द केल्याचं समजलं आहे. राहुल नार्वेकर पश्चिम आफ्रिकेतील घाना दौऱ्यावर जाणार होते मात्र त्यांनी हा दौरा रद्द केलाय. (Latest Marathi News)

शनिवारपासून ६६ वी राष्ट्रकुल संसदीय परिषद सुरू होत आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राहुल नार्वेकर या आठवड्याच्या सुरूवातीलाच घाना दौऱ्यावर जाणार होते. मात्र २५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीमुळे नार्वेकरांनी तेव्हाही दौरा रद्द केला होता. तसेच आता पुन्हा एकदा त्यांनी पश्चिम आफ्रिकेतील घानामधील आपला दौरा रद्द केला आहे.

आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबररोजी घेण्यात येणार आहे. यासाठीचं संभाव्य वेळापत्रक देखील जाहीर झालं आहे. त्यानुसार सुनावणीला ३ महिन्यांचा कालावधी किंवा पुढील वर्ष लागण्याची शक्यता आहे.

राहुल नार्वेकर मुख्य विषय सोडून इतर विषयांत वेळ घालवत आहेत असा आरोप करत ठाकरे गटाने आता न्यायालयात धाल घेतली आहे. ठाकरे गटाकडून दाखल याचिकेवर ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे नार्वेकरांनी आपला दौरा रद्द केल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT