Maharashtra Local Body Election Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

Maharashtra Local Body Election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शितल दाभाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Alisha Khedekar

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शितल महेश दाभाडे यांना उमेदवारी

२ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार

अजित पवार गटाच्या स्थानिक निवडणूक लढतीची ही पहिली सुरुवात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या २ आणि ३ डिसेंबरला स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यात जय्यत तयारी सुरु झाली आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शितल महेश दाभाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून आदीकृतरित्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता अजितदादांनी स्थानिकसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी लागली आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिलाच उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेमध्ये निवडणूक होत आहे. त्यापैकी गेवराई नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना उमेदवारी देत थेट विजयसिंह पंडित यांच्याकडून या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तारखा जाहीर केल्या. येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी या निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.

कसे आहे निवडणुकीचे वेळापत्रक ?

  1. अर्ज दाखल करण्याची तारीख – १० नोव्हेंबर २०२५

  2. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत – १७ नोव्हेंबर २०२५

  3. अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५

  4. अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत – २१ नोव्हेंबर २०२५

  5. आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत – २५ नोव्हेंबर २०२५

  6. निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५

  7. मतदान – २ डिसेंबर २०२५

  8. मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५

  9. निकाल जाहीर करण्याचा दिवस – ३ डिसेंबर २०२५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्यात 800 रुपयांची तर चांदी 1000 ची घसरण

Tula Pahta Movie: पहिलं प्रेम म्हणजे न विसरता येणारी आठवण...; 'तुला पाहता' उलगडणार चित्रपटातून तरल प्रेमाची अनवट कहाणी

8th Pay Commission: शिपाई ते IAS अधिकारी; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

Railway Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद, काय आहे या मागचं कारण?

दरवाढीचा भडका! डिझेल २५ रुपये, तर पेट्रोल इतक्या रूपयांनी महागण्याची शक्यता; पेट्रोलियम मंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT