Maharashtra Political News: मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. त्यामुळे राज्यात विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र सोडलं जातयं. यावर आदित्य ठाकरेंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री डरपोक असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री निवडणुकांना घाबरतात का?
"निवडणुकीवर स्थगिती येण्यामागे दोन गोष्टी असू शकतात. एक म्हणजे राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते एकनंबरचे डरपोक आहेत. ते घाबरत होते त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये उडी मारली. नाहीतर केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्यावर कारवाई केली असती. ईडीची कारवाई त्यांच्यावर झाली असती, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री निवणुकांना घाबरतात. लोकसभेच्या निवडणुका अद्याप होत नाहीयेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून झालेल्या नाहीत. या सर्वांत मुंबई विद्यापिठाच्या निवडणुका तरी होतील असं आम्हाला वाटलं होतं, असं यावेळी ते म्हणाले.
पुढे माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी सिनेटच्या आधिच्या निवडणुकांची आठवण करुन दिली. "काल रात्री अचानक मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीबाबत पत्र निघालं. निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असं त्यात म्हटलं. २०१० साली शिवसेनेनं सिनेटमध्ये १० पैकी ८ जागांवर बाजी मारली. २०१७ मध्ये १० पैकी १० जागा जिंकल्या. आता देखील सर्व निवडणूक कार्यक्रम घेण्यात आले. मात्र स्थगिती आल्याने नेमकं काय घडलं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे." , असं आदित्य ठाकरे म्हणाले
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.