Maharashtra Political News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद न देण्याचं आधीच ठरलं होतं; बड्या आमदाराचा गौप्यस्फोट

आता या सर्व घटनेवर आमदार नितीन देशमुख यांनी गौप्यस्फोट केला आहे.

Ruchika Jadhav

Nitin Deshmukh: साल २०१९ मध्ये शिवसेना- भाजप युतीला तडा गेला आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर शिंदेंच्या बंडामुळे पुन्हा एकदा शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकार स्थापन झालं आहे. या सरकारला आता एक वर्षाचा कार्यकाळ लोटला आहे. मात्र अद्यापही शिंदेंसह सूरतला गेलेल्या आमदारांची आणि तेव्हाच्या घडामोडींची चर्चा होत आहे. अशात आता या घडामोडींवर एका मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट झाला आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार कधी ठरलं? आमदार सुरतला कसे गेले? त्या वेळी बंद दाराआड नेमक्या कोणत्या चर्चा झाल्या? शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री कोण होणर अशी चर्चा सुरु असतानाच शिंदेंकडेच मुख्यमंत्री पद देण्यात आलं. याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. आता या सर्व घटनेवर आमदार नितीन देशमुख यांनी गौप्यस्फोट केला आहे.

सत्तांतर होण्याच्या एक महिना आधी आम्हाला असं काही घडणार असल्याची कल्पना होती. मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांनाच मिळणार हे आम्हाला माहिती होतं. देवेंद्र फडणवीस यांना कदाचीत याची काही कल्पना नव्हती. स्वत: एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री होणार आहे, असा खुलासा आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी काल आमदार नितीन देशमुख आणि आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये दोन्ही आमदारांनी चकित करणारे अनेक खुलासे केले आहेत. सध्या त्यांची ही मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे.

नितीन देशमुख यांनी मुलाखतीमध्ये पुढे म्हटलं आहे की, "उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कार्यकाळानंतरच राज्यात मुख्यमंत्री बदलण्यास सुरुवात झाली होती. देवेंद्र फडणवीसांना सत्तांतर होणार हे माहिती होतं. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याची त्यांना काही कल्पना नव्हती. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री कोण होणार हे माहिती होतं."

दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक

शिंदे गटातील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे वेळ देत नसल्याची तक्रार केली आहे. मात्र दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक होत होती आणि उद्धव ठाकरे स्वत: तेथे उपस्थित असायचे. त्यामुळे ते वेळ देत नव्हते असं कोणीच म्हणू नये, असं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT