दिल्लीत सुरू असलेल्या एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं. ' आपली युती फक्त निवडणुकांसाठी नाही. ही भावनिक युती आहे. आपली युती 25 वर्षापेक्षा अधिक वेळेची आहे, ती अभेद्य राहावी. आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदारांना केलं.
'सत्तेत सगळ्यांचा समान वाटा असेल. अनेक नेत्यांमधे क्षमता असताना त्यांना पंतप्रधान होता आलं नाही. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला डावलल गेलं, असेही ते म्हणाले.
जालन्यातील पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला मंठा ते जालना रोडवर अपघात झाला आहे. मंठा जवळील केंधळी येथील ब्रिजखाली ही बस गेली आहे. या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम सुरु आहे. याच ठिकाणी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस पुलाखालील खड्ड्यात गेली आहे.
या बसमध्ये 45 प्रवासी होते. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी हानी झाली नसल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्वीटरवरून धमकी देणारा आरोपी कैलास सूर्यवंशीला अटक गाडगेनगर पोलिसांनी यवतमाळवरून केली अटक. 30 जुलै रोजी कैलास सूर्यवंशी यांनी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांना पीटरवरून दिली होती धमकी. तब्बल आठ दिवसानंतर पोलिसांनी कैलास सूर्यवंशीला केली.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरण, एडलवाईज कंपनीच्या प्रतिनिधींची 8 तास चौकशी, पोलिसांच्या नोटीसनुसार आवश्यक कागदपत्र घेऊन आले होते, कागदपत्र अपूर्ण होते, एडलवाईज कंपनीचे एकूण 4 प्रतिनिधी हजार होते, कंपनीचे एमडी फनिंद्रनाथ काकरला यांची केली कसून चौकशी, सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली माहिती.
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी परत मिळाली आहे. त्यानंतर आता खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल यांना दिल्लीतील १२ तुलघल लेन रस्त्यावरील बंगला पुन्हा मिळाला आहे.
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलंच घेरलं आहे. राहुल गांधी यांच्या संसदेतील एन्ट्रीनंतर विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात, पण ते मणिपूरची बात करायला तयार नाहीत.
त्यांनी मणिपूरविषयची आपली भूमिका स्पष्ट करावी, असं विरोधक म्हणत आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर आजपासून म्हणजेच मंगळवारपासून पुढील तीन दिवस चर्चा होणार आहे.
या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी समान वेळ मिळणार आहे. त्यामुळे या तीन दिवसांत नेमकं काय होतं? दरम्यान, पहिल्याच दिवशी विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला धारेवर धरलं असून मणिपूर हिंसाचारानंतर तेथील मुख्यमंत्र्यांना बडतर्फ का केलं नाही? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी नावीन अपडेट समोर आली आहे. आरोपी राजकुमार बंसल आणि रसेश शहा यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलीये. गुन्हा दाखल करताना पोलिसांनी आपली बाजू जाणून न घेताच कारवाई केली असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी वारंवार तगादा लाऊन मानसिक त्रास दिल्याची तक्रार देसाईंच्या पत्नीने केली होती. पत्नीच्या तक्रारीवर खालापूर पोलिसांनी पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद केलाय.
बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच आहे. आज या संपाचा ७ वा दिवस आहे. संपकरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीये. सोमवारी रात्री उशिरा ठाण्यात ही भेट झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संपकरी कंत्राटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता आहे.
Maharashtra Political News: NDA च्या महाराष्ट्रातील खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान मोदी क्लस्टर बैठका घेत आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक होणार आहे. सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.