CM Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा होता; सरकारच्या वर्षपूर्तीनंतर CM एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमने

या यशामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यावर त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेला आज १ वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे या यशामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. (Latest Maharashtra Political News)

वर्षपूर्तीबाबत आज आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, " ३० जूनला माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथ विधी झाला. त्याच्या आधीचा इतिहास मी सांगू इच्छित नाही. शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन व्हावे अशी अनेकांची इच्छा होती. ती इच्छा आम्ही पूर्ण केली. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांना मनापासून धन्यवाद देईन आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सिंहचा वाटा होता. मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देईन."

"पहिली कबिनेट होती त्यात आम्ही दोघेच होतो. त्यासाठी आम्ही जनहिताचे निर्णय घेतले, आता ४० कॅबिनेटनंतर देखील वैयक्तिक लाभाचा निर्णय तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. काही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू होत्या. त्या महाविकस आघाडी सरकारच्या काळात बंद केल्या, पण आमचे सरकार आले आणि आम्ही त्या पुन्हा सुरू केल्या. मी मोदींना धन्यवाद देईन, सर्व केंद्रीय मंत्री यांना धन्यवाद देईन, त्यांनी आमचे कोणतेही प्रस्ताव मागे ठेवले नाहीत. देशात पहिल्या नंबरवर राज्याचे प्रकल्प आहेत, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

ऑन मंत्री मंडळ विस्तार

ऑन मंत्री मंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्यात काय मोठी गोष्ट नाही, पण आम्ह जे प्रकल्प केले ते तुम्ही दाखवा. आमच्या योजना तुम्ही दाखवू नका. जे निर्णय घेतले ते दाखवा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्री मंडळ विस्तारासाठी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले आहेत.

सरकार कोसळणार?

शिंदे-फडणवीस (Shinde - Fadnavis) सरकार स्थापन झाल्यावर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार येत्या काही महिन्यांमध्येच कोसळणार असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे की, "ज्यांना असं वाटतं त्यांना त्यांच्या स्वप्नात राहू द्या. मी त्यांना शुभेच्छा देतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT