Kirit Somaiya Saam Tv
महाराष्ट्र

Kirit Somaiya News: किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे निर्देश

किरीट सोमय्या यांच्या विरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (Kirit Somaiya)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी कारवाई करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या मुद्दाम विरोधकांना लक्ष करत आहेत आणि त्यांच्यामागे ईडी लावत आहेत. असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला होता. तसेच या प्रकरणी चौकशीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नेमकं काय घडलं होतं?

कोल्हापूर येथील हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर काही दिवसांपूर्वी ईडीने छापा टाकला होता. या प्रकरणी त्यांच्या विरोधात कोल्हापूरात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ईडीची चौकशी सुरू झाली. या सर्व गोष्टी हेतुपरस्पर होत असल्याचा ठपका मुश्रीफांनी भाजप नेत्यांवर ठेवला आहे.

‘राजकीय हेतूने प्रेरित षडयंत्र’

आपल्यावर कोल्हापूरात दाखल केलेला गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा ‘राजकीय हेतूने प्रेरित षडयंत्र’आहे. गेल्या ७ ते ६ महिन्यांपासून मला अशा प्रकारे ईडी कारवाईत अडकवले जात आहे, असं हसन मुश्रीफ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. हे षडयंत्र किरीट सोमय्या यांनी हाती घेतलं आहे असं देखील ते म्हणाले होते. त्यामुळे या प्रकरणी आता किरीट सोमय्या यांच्या विरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT