Ban Indic tales Saam TV
महाराष्ट्र

Ban Indic tales: पुतळे हटवल्याने राष्ट्रवादी आक्रमक; अजित पवारांसह भुजबळ अन् जयंत पाटील उतरले रस्त्यावर

राष्ट्रावादीनेही या प्रकरणी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरण्याची भूमीका घेतली आहे.

Ruchika Jadhav

Ncp Leaders Indic tales: सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवल्यानं राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय. हे प्रकरण शांत होत नाही तोच सावित्रीबाई फुलेंविषयी अक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. राष्ट्रवादीनेही या प्रकरणी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरण्याची भूमीका घेतली आहे. (Latets Political News)

भारताच्या इतिहासात स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचेल्या सावित्रीबाई फुले तसेच अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे काढल्यामुळे छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील हे तिन्ही मोठे नेते रस्त्यावर उतरले आहेत.

'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंविषयी अक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार अन् जयंत पाटलांनी केली आहे.

छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं आहे. 'इंडिक टेल्स' नामक मनुवादी वृत्तीच्या वेबसाइटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीचं लिखाण करण्यात आलेलं आहे. या लेखातील भाषा अतिशय अपमानजनक आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे, असं भुजबळ यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. तसेच आज राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुंबई पोलिस आयुक्तांना भेटणार असून त्यांच्याकडे या बाबत तक्रार दाखल करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस आणि तेल टंचाईवर लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

देशभरातील पेट्रोल-डिझेल आणि LPGची टंचाई होणार दूर; केंद्र सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

विधानसभेत 'न भूतो न भविष्यति' बदल होणार, ४९ वर्षांनंतर आमदारांची संख्या वाढणार? काय परिणाम होईल? जाणून घ्या…

Kale Mani Mangalsutra Designs: काळे मणी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, मराठमोळा लूक येईल खुलून

IAS अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर रंगला जुगाराचा डाव; अचानक टाकली धाड, कारवाईत ३ पोलीस कर्मचारी सापडले

SCROLL FOR NEXT