Doctors protest as controversy erupts over political interference in MMC elections. saam tv
महाराष्ट्र

MMC Elections: राजकीय हस्तक्षेपामुळे एमएमसी निवडणुकीत 'आयएमए'त फूट

MMC Elections 2026: महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकांपूर्वी आयएमएमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. डॉक्टरांमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • एमएमसी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपाचे आरोप

  • आयएमएमध्ये अंतर्गत फूट

  • माजी पदाधिकाऱ्यांचा विरोध

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक होणार आहे. जवळपास ९ वर्षांनंतर एमएमसीची निवडणूक होत आहेत. या निवडणुका २६ एप्रिल रोजी होणार आहेत. एमएमसीच्या निवडणुकीसाठीच्या अर्जाची नुकतीच छाननी करण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये प्रचारात सत्ताधारी राजकीय पक्षाने हस्तक्षेप केला आहे. यामुळे देशातील सर्वात मोठ्या डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राच्या संघटनेत फूट पडली आहे.

माजी पदाधिकाऱ्यांनी त्याविरोधात दंड थोपटलेत. या पॅनेलमधील उमेदवारांना माघार घ्या, अन्यथा सरकारी रोष ओढवून घ्याल अशा स्वरूपाचे दूरध्वनी येत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आयएमएचे अस्तित्त्व टिकविणारी ठरेल. एमएमसीची निवडणूक दर पाच वर्षांनी होणे अपेक्षित असते. परंतु गेल्या अडीच वर्षांपासून ही निवडणूक झाली नाहीये.

मात्र शासनाने या ठिकाणी प्रशासक बसवला आहे. दोन वर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली त्यावेळी मतदार यादीतून डॉक्टरांची नावे वगळणे, निवडणूक अधिकाऱ्याच्या नियुक्तीमध्ये घोळामुळे न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. एमएमसीच्या निवडणुकीसाठीच्या अर्जाची नुकतीच छाननी करण्यात आली आहे. ७० उमेदवारांनी अर्ज सादर केली आहेत. उमेदवारांपैकी ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

त्यामुळे ५९ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. यात आयएमए-महाराष्ट्र, हिलिंग हॅण्ड युनिटी पॅनेल व परिवर्तन असे तीन महत्त्वाचे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. अन्य उमेदवार हे स्वतंत्ररित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT