Shinde Sena and Thackeray faction face off as talks of a major political split intensify in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शिंदेंसेनेचे 22 आमदार फुटणार?

Another Political Quake in Maharashtra: महायुतीतील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय... अशातच आता शिंदेसेनेचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा ठाकरेसेनेनं केलाय.. त्यामुळे राज्यातील हा राजकीय भूकंप कधी होणार? या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे आहे?

Suprim Maskar

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होणार असल्याची चर्चा रंगलीय... सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षातले आमदार फुटणार असल्याचा दावा अनेकदा केला जातो... मात्र अशातच विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील राजकीय भूकंपाचे संकेत दिलेत.. शिंदेचे 22 आमदार मुख्य़मंत्र्यांच्या हाताशी लागलेत, असा खळबळजनक दावा आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय....तर शिंदेसेनेचे आमदार आमचेच असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय..

दुसरीकडे विरोधकांच्या दाव्याला प्रत्युत्तर देत... ठाकरेसेनेच्या कार्यपद्धतीला वैतागलेले 13 आमदार आपल्य़ा संपर्कात असल्याचा दावा शिंदेसेनेच्या संजय शिरसाटांनी केलाय..तसचं त्या सगळ्या आमदारांची नावे माझ्याकडे आहेत, फक्त वेळ आल्यावर सांगेन, असंही शिरसाटांनी नमूद केलंय.

2022 मधील फोडाफोडीच्या राजकारणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच आमदार संपर्कात असल्याचा आणि विरोधी राजकीय पक्षाचे आमदार फुटणार असल्याचा दावा वारंवार दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून केला जातोय...अशातच गेल्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना या मित्रपक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं विरोधकांना टीकेची चांगलीच संधी मिळाली

त्यात जागावाटपावरूनही महायुतीत रस्सीखेच सुरु असल्यानं शिंदेसेना नाराज आहे.. त्यामुळे राज्यात खरचं पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? या भुकंपाची धग नेमकी कोणाला बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

Tuesday Horoscope : प्रेम, पैसा आणि यश मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू

धनूभाऊंनी दिली जरांगेंची सुपारी? जरांगेंच्या घातपातासाठी अडीच कोटींची डील?

Maharashtra Live News Update: मीरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात मध्यरात्री तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा

वाघाचा बाईकस्वारावर हल्ला? शेपटीवरून बाईक नेणं पडलं महागात?

SCROLL FOR NEXT