Narhari Zirwal on 16 MLAs disqualification saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाने निर्णय अध्यक्षांकडे सोपवला तर काय होईल? नरहरी झिरवळ यांनी स्पष्टच सांगितले...

Narhari Zirwal on 16 MLAs disqualification: राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल येणार आहे. त्यामुळे उद्यात शिंदे-फडणवीस सरकार राहणार की कोसळणार याचा निर्णय होणार आहे.

Chandrakant Jagtap

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल येणार आहे. त्यामुळे उद्यात शिंदे-फडणवीस सरकार राहणार की कोसळणार याचा निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला किंवा विधानसभा अध्यक्षांकडे तो निर्णय आला तर काय होणार याबाबात राज्यासह देशातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे. यावर विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

नरहरी झिरवळ म्हणाले, त्यावेळी जो मी निर्णय दिला, तो कुठल्या राजकीय आकसापोटी किंवा कुठला हेतू ठेवून दिलेला नाही. कारण विधासभा हे एक सार्वभौम सभागृह आहे आणि ते घटनेनुसार चालते, धोरणावर आणि नियमांनुसार चालंत. त्यापद्धतीने मी योग्य तो निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की न्यायदेवाता माझ्या निर्णयाचा नक्कीच विचार करेल की मी दिलेला निर्णय योग्य आहे असे झिरवळ म्हणाले.

माझ्यासमोर आता एवढे दिवस झालेला युक्तीवाद आहे. निर्णयासाठी जर तो निकाल माझापर्यंत येणार असेल तर मी तेव्हा अपात्रतेची केलेली प्रक्रिया घटनेचा आधारेच केलेली आहे. त्यामुळे त्यात बदल करण्याचं काही काम नाही असे देखील झिरवळ म्हणाले.

न्यायालय निर्णय घेणार की नाही आणि न्यायालय निर्य़ण घेऊ शकते का? यावर बोलताना झिरवळ म्हणाले की एकाद्या कायदेशीर प्रक्रियेबाबात सभागृहात तोडगा निघत नसेल तर त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्ट आहेच. कारण हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, असे झिरवळ म्हणाले. (Latest Political News)

सर्वोच्य न्यायालयाने अध्यक्षांकडे प्रकरण सोपवले तर नार्वेकर की तुम्ही कोण निर्णय घेईल असा प्रश्न विचारल्यानंतर झिरवळ म्हणाले, एकूणच सगळा विचार आणि अभ्यास केला तर तो निर्णय मी दिला आहे, त्यामुळे आताही तो निर्णय देण्याचा अधिकार मलाच आहे असे नरहरी झिरवळ म्हणाले. कोर्टाने त्यावर निर्णय दिला तर ते देऊ शकते. परंतु तो निर्णय माझ्याकडे आला तरी मी आधी दिलेला निर्णयच योग्य असल्याचा निर्णय़ पुन्हा देईल.  (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT