Chhagan Bhujbal/Sharad Paawar Saam TV
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: तर ही वेळ आली नसती... छगन भुजबळांची शरद पवारांवर खोचक टीका; येवल्याच्या सभेवरुन साधला निशाणा

Maharashtra Politics: मंत्रीपद मिळाल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत केले.

अभिजीत सोनावणे

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी (NCP) पक्षात दोन गट पडल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारला पाठींबा दिला. त्यानंतर दोन्ही गटाकडून पक्षावरही दावा ठोकला जात आहे.

या बंडखोरीनंतर दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी भुजबळ समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी येवल्यामध्ये बोलताना छगन भुजबळांनी शरद पवारांवर निशाणा साधला. (Maharashtra Politics News)

काय म्हणाले छगन भुजबळ...

राष्टवादीमधील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी छगन भुजबळांच्या बालेकिल्ला असलेल्या येवल्यात जाहीर सभा घेतली होती. याच सभेवरुन छगन भुजबळांनी पवारांवर निशाणा साधला. "येवल्यात येऊन कोणाचा हात धरण्यापेक्षा मुलाबाळांचा हात धरला असता तर ही वेळ आली नसती; " अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

तसेच शरद पवार यांनी येवल्यातील सभेत आमदार नरेंद्र दराडे यांचा हात उंचावला होता. याबद्दल बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी "अजित दादांचा हात धरायचा ना? ज्यांचा हात धरला त्यांचा धरून काय उपयोग.. "अशा शब्दात पवारांवर हल्लाबोल केला.

मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये....

दरम्यान, आज राज्य सरकारकडून नव्या मंत्र्यांसाठी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. या खातेवाटपात छगन भुजबळ यांना अन्नृ-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Thecha Recipe: मलायका अरोराची आवडती डिश; पनीर ठेचा बनवण्याची सोपी पद्धत नोट करा

Mira Road Protest: मीरा रोडमध्ये हायव्होलटेज ड्रामा; मनसे नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात|VIDEO

Kej Crime News : बोलली नाहीस तर आत्महत्या करीन, तुझ्या आई- वडिलांनाही मारीन; धमकावत शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

Maharashtra Live News Update : गंगापूर धरणातून सध्या 6336 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू

Pune : पुण्यात खाकीला डाग, पोलिसाने महिलेची केली फसवणूक, ७३ तोळे सोन्यासह १७ लाख लुबाडले

SCROLL FOR NEXT