Devendra Fadnavis News SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: सर्वात मोठी बातमी! भाजपचे राज्यात ऑपरेशन कमळ; मविआचे ४० आमदार फुटणार

BJP's Operation Lotus: भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Rashmi Puranik

Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणातील आत्ताचीसर्वात मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

राज्यात वज्रमूठ घेऊन पुढे जाणाऱ्या महविकास आघाडी खिंडार पाडण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच मोठा घाव घालून महाविकासआघाडी खिळखिळी करण्याचा प्लान भाजपने आखला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळततेय.

शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील आमदारांवर भाजपचा डोळा आहे. दोन्ही पक्षातून मोठ्या संख्येने आमदार भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. हे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याचं कळतंय.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदारांचा मोठा गट फुटणार असल्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसला देखील मोठा धक्का देण्याची तयारी भाजपने केल्याचे समजतंय. काँग्रेसचा एक मोठा नेता आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाऊ शकतो अशी देखील चर्चा आहे.

याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील दोन आमदार भाजपच्या संपर्कात असून हे दोन्ही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे पुन्हा निवडून येऊ शकणाऱ्या आमदारांना भाजपकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. लोकसभा नजरेसमोर ठेवून भाजपकडून ही सर्वात मोठी खेळी खेळली जाणार असल्याचे कळतंय. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

Cyclone Montha: आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर १०० किलोमीटर स्पीडनं धडकलं चक्रीवादळ; 'मोंथा' नावाचा अर्थ काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

Satara News : डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; PSI बदनेचा पाय आणखी खोलात जाणार, पोलिसांकडून महत्वाचा तपास सुरु

PSI बदने सापडला, मोबाईल मात्र गायब, बदनेच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचं गूढ?

SCROLL FOR NEXT